छत्तीसगडमध्ये होणार अमर जवान ज्योतीची पायाभरणी

३ फेब्रुवारीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये अमर जवान ज्योतीची पायाभरणी होणार आहे
Bhupesh Baghel
Bhupesh Baghelटिम ई सकाळ

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून तेवत असणारी इंडिया गेटवरील अमर ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन केली गेली. त्यानंतर इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती विझवण्यात आली. अमर जवान ज्योती विझवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयानंतर छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकारने छत्तीसगड येथे अमर जवान ज्योतीची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली आहे.

Bhupesh Baghel
काँग्रेसचा पराभव फक्त काँग्रेसच करु शकतं, इतर कुणीही नाही - सिद्धू

३ फेब्रुवारीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते अमर जवान ज्योतीची पायाभरणी होणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याविषयी माहिती दिली. जे देशासाठी लढत नाहीत त्यांना या अमर जवान ज्योतीचे महत्त्व समजणार नाही. मोदी आणि आमची विचारसरणी कधीही मेळ घालणार नाही. काँग्रेसची विचारसरणी ही गांधीजींची विचारसरणी आहे. सत्य, अहिंसेची विचारसरणी आहे तर मोदींची विचारसरणी ही गोडसे, सावरकरांची विचारसरणी जी हिंसाचार आणि कट रचणारी आहे, अशी प्रतिक्रिया भूपेश बघेल यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com