कर्नाटकच्या चित्रपटगृहांमध्ये 'बाहुबली-2' झळकणार

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

माफीनाम्यानंतर कन्नड संघटनांचे आंदोलन मागे

बंगळूर: कावेरी जलवादप्रकरणी कन्नड जनतेविरोधात तब्बल नऊ वर्षांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल प्रसिद्ध अभिनेते सत्यराज यांनी शुक्रवारी (ता.21) माफी मागितल्यानंतर कन्नड संघटनांनी "बाहुबली-2'च्या प्रदर्शनाविरोधातील आंदोलन मागे घेतले आहे. याबाबतची घोषणा शनिवारी करण्यात आली.

सत्यराज यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोन-तीन दिवसांपासून कर्नाटकमधील वातावरण तापले होते. अनेक कन्नड संघटनांनी "बाहुबली-2'चे प्रदर्शन रोखण्याचा इशारा दिला होता. "कन्नड ओकुटा' या संघटनेचे प्रमुख वटल नागराज यांनी सत्यराज माफी मागत नाही, तोवर आमचा विरोध कायम राहील, असे म्हटले होते. "बाहुबली'चा दुसरा भाग 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, त्या दिवशीच या संघटनेने बंगळूर "बंद'ची हाक दिली होती.
अखेर "बाहुबली'तील या कटप्प म्हणजेच सत्यराज यांनी बिनशर्त माफी मागितल्यानंतर चित्रपट कर्नाटकमध्ये प्रदर्शित होण्याचा मार्ग खुला झाला आहे. ""सत्यराज यांचा माफीनामा आम्ही स्वीकारतो. हा विषय ताणण्यात आम्हाला काही स्वारस्य नाही. त्यामुळेच "बाहुबली-2'विरोधातील आमचे आंदोलन आणि "बंद'चे आवाहन मागे घेत आहोत, असे नागराज यांनी सांगितले.

सत्यराज यांनी पुन्हा कन्नड नागरिकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित करू देणार नाही; तसेच तमिळनाडूच्या चित्रपटगृहांमध्ये कन्नड चित्रपट दाखविण्यास परवानगी नाही, असे समजले आहे. हे वृत्त खरे असल्यास आम्हीही तमीळ चित्रपट व तमीळ वाहिन्या दाखविणे बंद करू.
- वटल नागराज, कन्नड ओकुटा संघटना

Web Title: In the theaters of Karnataka, 'Bahubali 2' will be seen