बेळगाव तालुक्यात विळ्याचा धाक दाखवून म्हैशींची चोरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

एक नजर

  • विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता. बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून आठ म्हैशींची चोरी. 
  • शनिवारी ( ता.26) मध्यरात्रीची घटना

 

बेळगाव - विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता.बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून लाखो रुपये किमतीच्या आठ म्हैशी चोरण्यात आल्या. शनिवारी ( ता.26) मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी याबाबत गावात माहिती समजताच एकच खळबळ उडाली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, अनोळखी व्यक्तीने शनिवारी रात्री अप्पय्या शेलार या कामगाराच्या तोंडात कपड्याचा गोळा कोंबला. त्याला विळ्याचा धाक दाखवत त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर गोठ्यातील दहा पैकी आठ म्हशी या अनोळखी व्यक्तीने चोरल्या. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस उपायुक्त यशोधा वंटगोडी, काकतीचे पोलीस निरीक्षक गौंडी, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन हांचीनमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Web Title: theft of buffalo in Belgaum Taluka