...तर पेट्रोल-डिझेल मिळेल 35 रुपयांत : रामदेवबाबा

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनापूर्वी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रामदेवबाबांनी ही माहिती दिली. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारवर विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून टीका केली जात आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबाबत योगगुरू रामदेवबाबा यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ''पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून सर्वाधिक कर जमा केला जातो. सध्या पेट्रोल 35 ते 40 रुपयांत मिळू शकते. मात्र, सरकारी तिजोरी खाली होऊ नये याची भीती आहे. त्यामुळे हे कर रद्द केल्यास पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते'', असे रामदेवबाबा यांनी सांगितले. 

petrol

21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनापूर्वी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रामदेवबाबांनी ही माहिती दिली. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारवर विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून टीका केली जात आहे. यावर रामदेवबाबा यांनी आपले मत व्यक्त केले. पेट्रोल डिझेलचे दर अधिक नसावे. रामदेवबाबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरकार चालवायचे आहे. इंधनांच्या किंमतीतून देशात सर्वात जास्त कर जमा होतो. त्यामुळे हे दर कमी केल्यास पेट्रोल 35 ते 40 रुपयांत मिळू शकेल. मात्र, असे केल्यास सरकारी तिजोरी रिकामी होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, यूपीए सरकारच्या कार्यकाळात रामदेवबाबांनी दावा केला होता, की सरकारने ठरवल्यास पेट्रोल आणि डिझेल ३५ रुपये प्रतिलिटर मिळू शकेल. 

Web Title: then petrol diesel will available for rs 35 only Ramdevbaba