...तर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार : संरक्षणमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले. त्यानंतर आता आमच्या सरकारची हीच भूमिका आहे.

- निर्मला सीतारामण, संरक्षणमंत्री

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. तसेच रमजान महिन्याच्या काळातही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, की ''भारत शस्त्रसंधीच्या कराराचा आदर करतो. मात्र, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल''. 

रमजान महिन्याच्या काळात पाकिस्तानकडून अद्यापही शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यावर सीतारामण म्हणाल्या, "भारताकडून शस्त्रसंधीच्या कराराचा आदर केला जात आहे. मात्र, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने लष्कराशी चर्चा करून घेतला होता. मात्र, जर पाकिस्तानकडून अशाप्रकारे हल्ले केले जात असतील तर त्यास प्रत्युत्तर देताना कारवाई करण्याचा अधिकार लष्कराला आहे. त्यामुळे लष्कराला डिवचल्यास लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही सीतारामण म्हणाल्या.  

तसेच त्या पुढे म्हणाल्या, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले. त्यानंतर आता आमच्या सरकारची हीच भूमिका आहे.

Web Title: then we take right actions against terrorist