
- इस्त्रो, एसएआय आणि पोस्ट विभागात भरती
नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. त्यासाठी उमेदवारांकडून विविध ठिकाणी अर्जही केले जातात. पण आता विविध राज्यांत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सरकारी नोकरी मिळविण्यासाठी कर्मचारी पदासाठी केवळ दहावीपर्यंत शैक्षणिक पात्रता असली तरीदेखील पुरेसे आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये (इस्त्रो) नोकरीच्या संधी आहेत. तसेच भारतीय रेल्वे विभागातही नोकऱ्यांची संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. याशिवाय स्पोर्टस् अथोरिटी ऑफ इंडिया (एसएआय) विभागात अनेक पदांसाठी जागा रिक्त आहेत. त्यासाठी उमेदवार 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
एसएआयसाठी प्रोफेशनल युवा असे या पदाचे नाव आहे. यामध्ये 130 पदे रिक्त आहेत. या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यास त्याला 40,000 प्रतिमहिना असे वेतन आहे आणि त्यासाठी पदव्युत्तर शिक्षण अशी पात्रता असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
दिल्ली ठप्प; इंटरनेटसेवा बंद, मेट्रोवरही परिणाम; CAA विरोधात आंदोलन तीव्र
तसेच राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन विभागातही भरती होत आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी ही भरती होत आहे. त्यासाठी सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय डाक विभागातही विविध पदांसाठी भरती सुरु आहे.
आणखी वाचा - फडणवीसांच्या भारुडाला, उद्धव ठाकरेंचे भारुडानेच उत्तर
भारतीय लष्करातही नोकरीची संधी असून, आर्मी रिक्रूटमेंट रॅलीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
दरम्यान, विविध विभागांतील पदांची भरती करण्यासाठी संबंधित विभागाच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो.