भाजपसाठी अनुकूल वातावरण : येडियुरप्पा 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करण्यासारखे वातावरण आहे, असे विधान करत येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष वाय. एस. येडियुरप्पा यांनी कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार टिकण्याबाबत शंका व्यक्त केली.
 

बंगळूर : कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करण्यासारखे वातावरण आहे, असे विधान करत येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष वाय. एस. येडियुरप्पा यांनी कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार टिकण्याबाबत शंका व्यक्त केली.

कर्नाटकमधील कुंडगोल आणि चिंचोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत असून, या दोन्ही जागांवर भाजप विजयी होईल, असा विश्‍वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. "आम्ही ही पोटनिवडणुक मोठ्या फरकाने जिंकू. कॉंग्रेसने आमच्या अनेक नेत्यांना भुलविण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही एकसंध राहिलो.

राज्यात भाजपचे सरकार येण्यासारखे वातावरण असताना आमचा कोणताही नेता, कार्यकर्ता इतर पक्षांच्या मोहात पडणार नाही,' असे येडियुरप्पा म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is an atmosphere for BJP to form govt in Karnataka claims Yeddyurappa