"कॅटमाईन'प्रकरणी सरकारकडे नोंद नाही - मनोहर पर्रीकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पणजी : राज्यात सापडलेल्या कॅटमाईन साठासंदर्भातची अधिकृत माहिती सरकारकडे नोंद नाही. याप्रकरणी सरकारला माहितीही देण्यात आलेली नाही. राज्यात अंमलीपदार्थाचे उत्पादन होते याची माहिती नाही. केंद्रीय तपास यंत्रणेने (डीआरआय) या कॅटेमाईनप्रकरणी आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केला आहे व या यंत्रणेच्या तपासकामात सरकार हस्तक्षेप करू इच्छित नाही असे उत्तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासावेळी दिले. 

देशात व विदेशातील मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या किती प्रकाराच्या अंमलीपदार्थाचे (ड्रग्स) गोव्यात उत्पादन केले जाते असा प्रश्‍न आरोग्य खात्याच्या प्रश्‍नावेळी केला होता तेव्हा ऍलोपेथिक व आयुर्वेदिक औषधे असे उत्तर देण्यात आले होते. पुन्हा हाच प्रश्‍न गृह खात्याला विचारण्यात आला आहे तर राज्यात कसलेच अंमलीपदार्थाचे उत्पादन केले जात नाही असे उत्तर देण्यात आले आहे.

गोव्यात सुमारे 100 किलो कॅटेमाईन साठा सापडला, गांजासदृश्‍य अंमलीपदार्थाचे उत्पादन केलेल्या विदेशी नागरिकांना अटक केली. सरकार या प्रकाराबाबत गंभीर नाही. व्यसनाधिन तसेच नवीन तरुण पिढी या अंमलीपदार्थाकडे ओढली जात असून तो पोलिस ठाणे तसेच औद्योगिक वसाहतीच्या परिसरात उपलब्ध होत आहे ही सत्यस्थिती आहे. गोव्यात जुगार, अंमलीपदार्थ व वेश्‍या व्यवसाय सुरू आहेत यासंदर्भात सरकारकडून काय कारवाई करणार असा प्रश्‍न आमदार लुईझिन फालेरो यांनी विचारला होता.

Web Title: there is no any record of catamine to government said manohar parrikar