मोदीजी कधी हसतात, तर कधी रडतात- राहुल

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. आज देश बँकाबाहेर रांगेत उभा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी हसत आहेत, तर कधी रडत आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

मुंबई - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. आज देश बँकाबाहेर रांगेत उभा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी हसत आहेत, तर कधी रडत आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) बदनामीप्रकरणी राहुल गांधी आज (बुधवार) भिवंडी न्यायालयात हजर झाले. या खटल्यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असून, या खटल्याची पुढील सुनावणी 28 जानेवारीला होणार आहे. जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधा पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. 

राहुल गांधी म्हणाले, की जी व्यक्ती कणखर उभी राहू शकते, त्याला कोणी गुलाम करु शकत नाही, असे महात्मा गांधीजी म्हणत होते. त्यांच्या विचारांचीच लढाई आम्ही लढत आहोत. आज याठिकाणी फक्त राहुल गांधी उभा नसून, देशातील कोट्यवधी जनता उभी आहे. गांधींजींची विचारधारा पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एकीकडे देशातील मोजक्या उद्योगपतींना पैसे माफ करण्यात येत आहेत. मोदींच्या उद्योगपती मित्रांची चौकशी होताना दिसत नाही. तर दुसरीकडे तुमच्या खिशातून पैसे काढून त्याच उद्योगपतींना देण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदींचे सरकार त्यांच्यासाठी काम करत आहेत. देश बँकांबाहेर उभा असताना मोदीजी कधी हसत आहेत, तर कधी रडतात. नोटाबंदीचा त्रास सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: There is no investigation or action taken against Modi ji's industrialists friends, says RahulGandhi