मोदींच्या पत्रात चर्चेचा उल्लेख नाही 

यूएनआय
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (यूएनआय) : पाकिस्तानमध्ये नव्या सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेऊन बारा तासही पूर्ण नाही होत, तोच त्यांच्या मंत्र्यांनी आपल्या पूर्वसुरींचा खोटारडेपणाचा वारसा पुढे चालविण्यास सुरवात केली आहे. भारताने पाकिस्तानबरोबर चर्चा सुरू करण्याचे सूचित केल्याचा दावा पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी आज केला. भारताने मात्र हा दावा तातडीने फेटाळून लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 ऑगस्टला पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्याचे आज भारत सरकारने जाहीर केले.

या पत्रात मोदी यांनी पाकिस्तानबरोबर चांगले संबंध राखण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले असून, चर्चा सुरू करण्याची कोणतीही इच्छा व्यक्त केली नव्हती, असे आज भारताने स्पष्ट केले. "पाकिस्तानबरोबर चांगले संबंध निर्माण करण्यास भारत कटिबद्ध असून, दोन्ही देशांमधील नागरिकांच्या भल्यासाठी अर्थपूर्ण आणि ठोस व्यवहार करण्यास भारताचा पाठिंबा आहे,' असे पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांना पत्रात म्हटले होते, असे भारत सरकारने आज सांगितले. पाकिस्तानमध्ये नवे सरकार आल्यानंतर मोदींनी पाठविलेले पत्र हा भारतातर्फे झालेला हा पहिला अधिकृत संपर्क होता. कुरेशी यांनी मात्र आज इस्लामाबादमध्ये बोलताना मोदी यांनी पत्राद्वारे चर्चा सुरू करण्याचे सूचित केल्याचा दावा केला. भारत आणि पाकिस्तानला एकमेकांशी चर्चा करण्याशिवाय पर्यायच नसल्याचेही कुरेशी या वेळी म्हणाले होते. 

Web Title: There is no mention of discussion in Modi's letter