"इस्लामिक दहशतवादावर अभ्यासक्रम नाही'

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) इस्लामिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत झाला नसल्याचे उत्तर "जेएनयू'च्या प्रशासनाने दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या नोटिशीला दिले, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष जफरूल इस्लाम खान यांनी मंगळवारी दिली. 

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) इस्लामिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत झाला नसल्याचे उत्तर "जेएनयू'च्या प्रशासनाने दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या नोटिशीला दिले, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष जफरूल इस्लाम खान यांनी मंगळवारी दिली. 

इस्लामिक दहशतवादावरील अभ्यासक्रम सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव "जेएनयू'च्या शैक्षणिक परिषदेत झाला नाही, असे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी स्पष्ट केल्याचे खान यांनी सांगितले. "इस्लामिक दहशतवाद' अभ्यासक्रमाबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत दिल्ली अल्पसंख्याक आयोगाने गेल्या महिन्यात "जेएनयू'ला नोटीस बजावली होती. असा अभ्यासक्रम सुरू करण्याचे कारण त्यात विचारले होते.

Web Title: There is no syallbus of Islamic terrorism in jnu