काँग्रेस मुर्खांचे स्थळ : अमित शहा

There is only one place for idiocy is Congress says Amit Shah
There is only one place for idiocy is Congress says Amit Shah

नवी दिल्ली : ''भारताचे तुकडे-तुकडे गँग, माओवादी, बोगस कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांना पाठिंबा. प्रामाणिक आणि मेहनतीने काम करणाऱ्यांना दोष द्या. राहुल गांधींच्या काँग्रेसचे स्वागत आहे'', अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली. तसेच मुर्खांचे एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस, असेही ते म्हणाले. 

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेली ही अटक योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''मुर्खांचे एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस आहे. भारताचे तुकडे-तुकडे गँग, माओवादी, नकली कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांचे समर्थन करा. मेहनतीने काम करणाऱ्यांना बदनाम करा. राहुल गांधींच्या काँग्रेसचे स्वागत आहे".

तसेच ''ज्या लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण करून त्याला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. अशा सर्वांचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे शहरी नक्षलवादावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेससाठी हीच योग्य वेळ आहे'', अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर ट्विटरवरून निशाणा साधला.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com