कर्नाटकात काँग्रेसमध्ये असंतोष उफाळला

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 डिसेंबर 2018

बंगळूर : मंत्रिमंडळ विस्तारासाठी नव्या मंत्र्यांची नावे जाहीर होताच कॉंग्रेस पक्षात असंतोष उफाळला आहे. काही आमदारांचे कार्यकर्ते व समर्थक रस्त्यावर उतरले व कॉंग्रेस नेत्यांच्या विरोधात त्यांनी जोरदार निदर्शने केली. मंत्रिपदापासून वंचित काही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला. 

कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय कॉंग्रेस नेत्यांनी घेतला. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी नव्या मंत्र्यांची नावे निश्‍चित केली. विद्यमान दोघा मंत्र्यांना वगळून नव्या आठ जणांना मंत्रिमंडळात संधी देण्याचा निर्णय कॉंग्रेस "हायकमांड'ने घेतला. नव्या मंत्र्यांची नावे उघड होताच मंत्रिपदापासून वंचित आमदारांत तीव्र असंतोष पसरला. काही असंतुष्ट आमदारांनी बंडाचे निशाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष नेत्यांविरुद्ध जाहीर वक्तव्य करून त्यांनी आपला राग व्यक्त केला. 

आमदार बी. सी. पाटील व आमदार अजय सिंग यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना मंत्रिपद मिळाले नसल्याच्या निषेधार्थ आत्महत्येचा प्रयत्न केला. गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोळीचे आमदार डॉ. उमेश जाधव यांना मंत्रिपद मिळाले नसल्याच्या निषेधार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. 

आमदार बी. के. संगमेश म्हणाले, "समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. कार्यकर्ते व मतदारांची मते विचारात घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी सांगितल्यास आमदारापदाचाही राजीनामा देण्याची माझी तयारी आहे. आमदार बी. सी. पाटील, शामनूर शिवशंकरप्पा यांनीही नाराजी व्यक्त केली.

Web Title: There was dissatisfaction with the Congress in Karnataka