मला बोलू दिले तर भूकंप होईल: राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - "जर मला लोकसभेत बोलण्याची परवानगी दिली तर भूकंप होईल', असे वतव्य कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

नवी दिल्ली - "जर मला लोकसभेत बोलण्याची परवानगी दिली तर भूकंप होईल', असे वतव्य कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला. मात्र तरीही परिस्थिती सुधारली नसल्याची टीका करत विरोधी पक्षांनी गुरुवारी "काळा दिवस' पाळला. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आज (शुक्रवार) राहुल गांधी म्हणाले, "सरकार चर्चेपासून दूर पळत आहे. जर त्यांनी मला बोलण्याची परवानगी दिली तर भूकंप होईल. नोटाबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे. मला त्याबद्दल लोकसभेत बोलायचे आहे. मी तेथे सर्वकाही सांगेल. गेल्या महिनाभरापासून आम्ही नोटाबंदीवर चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत.' तसेच "आम्हाला हा मुद्दा संपवून टाकायचा आहे' असेही गांधी पुढे म्हणाले.

दरम्यान आज सकाळीच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिंहा राव वृत्तसंस्थेशी बोलताना गांधींवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, "दुसऱ्या पक्षाचे सोडा राहुल गांधींना कॉंग्रेसमध्येही कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यांना केवळ इटलीची संस्कृती माहिती आहे भारताची नाही.'

Web Title: There will be earthquake if I speak on currency ban in Lok Sabha: Rahul Gandhi