मंदिरातून नोकऱ्या निर्माण होणार नाहीत : पित्रोदा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

गांधीनगर : भविष्यात मंदिरातून नोकऱ्या निर्माण होणार नाहीत. केवळ विज्ञानातूनच भविष्याची निर्मीती होऊ शकते. जेव्हा रोजगाराचा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा अशा मुद्यांना राजकिय रंग देऊन तरुणांचे लक्ष विचलीत केले जाते. यामध्ये वास्तव कमी आणि आश्वासने जास्त असतात. असे मत तंत्रज्ञानाचे अभ्यासक सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले. गांधीनगर येथील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पित्रोदी बोलत होते.

पित्रोदी म्हणाले, जेव्हा या देशात मंदिर, इश्वर, जाती, धर्माविषयीच्या चर्चा ऐकतो, तेव्हा मला भारताची चिंता वाटू लागते. देशातील राजकिय नेते देशातील तरुणांना आणि लोकांना वेडे बनविण्याचे काम करत आहेत. आज देशात महत्त्वाचे प्रश्न सोडून नको त्या प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. यामुळे तरुण भरकटत असून चुकीच्या दिशेने चालला आहे.

कोणीही जेव्हा रोजगाराच्या प्रश्नावर बोलू लागतो. तेव्हा त्याला राजकीय रंग देऊन गप्प करण्याचा प्रयत्न होतो. मग अचानक मंदीर, धर्म, जातीचे मुद्दे पुढे केला जातात. आणि तरुणांना इतर विषयांकडे भरकट घेऊण जाण्यात येते. देशातील खाजगी क्षेत्रातही विज्ञानाचा हवा तेवढा वापर केला जात नाही. असेही पित्रोदा म्हणाले. 

Web Title: There will be no job creation from the temple: Pitroda