दिल्लीत ISI च्या 6 बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजवर छापा; तिघांना अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट करण्यासाठी आणि जम्मू काश्‍मिरमधील लष्करासंदर्भातील गोपनीय माहिती प्राप्त करण्यासाठी दिल्लीत कार्यरत असलेल्या पाकिस्तानमधील आयएसआयच्या तीन एजंटांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. "एफआयआयटी-जेईई'च्या कोचिंग सेंटरमध्ये हे तिघे बेकायदेशीरपणे अत्याधुनिक असे सहा टेलिफोन एक्‍स्चेंज चालवित असल्याचे समोर आले आहे.

मागील आठवड्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील पंजाबी बाग येथील "एफआयआयटी-जेईई' कोचिंग सेंटरमध्ये मागील वर्षापासून बेकायदेशीररित्या सहा अत्याधुनिक टेलिफोन एक्‍स्चेंज सुरू होते. त्याद्वारे हे तीन एजंट जम्मू-काश्‍मीरमधील लष्करातील अधिकाऱ्यांना वरिष्ठ बोलत असल्याचे सांगत गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत होते. भारतात करता येऊ शकतील, अशा दहशतवादी हल्ल्याचा कटही करण्यात येत होता.

या प्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील मेहरौली येथून गुलशन सेन, लखनौतील सितापूर येथून श्‍याम बाबू आणि शिवेंद्र मिश्रा यांना ताब्यात घेतले आहे. या पैकी सेन हा कोचिंग सेंटरचा तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख म्हणून काम पाहात होता. सेंटरमधील विविध खोल्यात टेलिफोन एक्‍स्चेंज सुरू होते. व्हीपीएन (Virtual Private Network) तंत्रज्ञानाद्वारे हे तिघे पाकिस्तानमधील त्यांच्या हस्तकांशी तसेच इतर ठिकाणी संपर्क करत होते. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अरुण यांनी दिल्लीतील विविध संशयास्पद ठिकाणी छापे टाकले. "आयएसआयचे एजंट लष्कराच्या कारवायांची गुप्तपणे माहिती घेत होते. बनावट टेलिफोन एक्‍स्चेंजद्वारे सेनने त्याच्या सहकाऱ्यांना संपर्कासाठी बेकायदेशीर आणि सुरक्षित माध्यम उपलब्ध करून दिले. त्याद्वारे हे सारे लष्करातील अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत होते', अशी माहिती अरुण यांनी दिली.

या प्रकरणाशी संबंधित फरार झालेल्या इतर पाच जणांचा शोध घेण्यात आहे. याशिवाय, या एक्‍स्चेंजद्वारे किती ठिकाणी फोन करण्यात याचाही शोध घेण्यात येत आहे.

Web Title: These 3 ISI agents were running a telephone exchange at a FIIT-JEE centre