केंद्रीय अर्थसंकल्प छापण्याआधी मंत्रालयात का बनतो हलवा?

पीटीआय
शनिवार, 22 जून 2019

- अर्थसंकल्प छपाई करण्यापूर्वी तयार केला जातो हलवा.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या छपाईच्या सुरवातीआधीचा हलवा बनविण्याचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार 5 जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहे. 
याआधी सरकारने 1 फेब्रुवारीला अंतरीम अर्थसंकल्प मांडला होता. आता नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहे. अर्थसंकल्पाच्या छपाईआधी अर्थमंत्रालयामध्ये मोठ्या कढईत हलवा बनविला जातो. ही वर्षानुवर्षे सुरू असलेली पद्धत आहे. मंत्रालयातील सर्वांना या हलव्याची मेजवानी दिली जाते. आज दुपारी हा हलवा बनविण्याचा कार्यक्रम झाला.

अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थमंत्रालयातून बाहेर पडता येत नाही. तसेच, कुटुंबीयांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क करता येत नाही. त्यांचे तोंड गोड करणे, हे यामागील मुख्य उद्देश असतो. 

या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग, महसूल सचिव अजय भूषण पांडे, वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार आणि गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव अतानू चक्रवर्ती आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These are Reasons to making Halwa Before Budget