कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरलेत हे तीन देश; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

जगात रोज दीड लाख रुग्णांची भर
२२ जानेवारीला पहिल्यांदा कोरोनाचे २६५ रुग्ण सापडले होते. फेब्रुवारीत दररोज सरासरी २००० आणि मार्चमध्ये दिवसाला ७४ हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत. एप्रिलमध्ये दररोज एक लाख नव्या रुग्णांची नोंद व्हायची. मे महिन्यात नव्या रुग्णांची संख्या दिवसाला लाखापर्यंत होती, परंतु जूनमध्ये ही संख्या दिवसाला सरासरी दीड लाखावर पोचली आहे.

मुंबई - पहिल्या टप्प्यात कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या देशांमध्ये आता रुग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे, परंतु सुरुवातीला अतिशय कमी रुग्ण असलेले ब्राझील, रशिया आणि भारत हे देश आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत आहेत.

चीनमधील वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना जगभरात पसरला. चीननंतर इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि इराण या देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला. कोरोनामुळे इटलीत ३४,१६७, स्पेनमध्ये २७,१३६, फ्रान्समध्ये २९,३४६, जर्मनीत ८७६३ आणि इंग्लडमध्ये ४१ हजारांहून अधिक बळी गेले. या देशांत रुग्णसंख्येने सरासरी अडीच लाखांचा टप्पा गाठल्यानंतर कोरोना मंदावला. त्यानंतर अमेरिका, तुर्कस्थान या देशांत कोरोना झपाट्याने पसरला. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक म्हणजे १,१३,००० बळी गेले; तर २० लाखांना बाधा झाली.

No photo description available.

तिसऱ्या टप्प्यात ब्राझील, रशिया आणि भारत हे देश कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्तान, चिली, मेक्‍सिको, सौदी अरेबिया, पेरू आदी देशांतही कोरोना वाढत चालला आहे. ब्राझीलमध्ये संख्या आठ लाखांवर पोचली आहे; तर रशियाने पाच लाखांचा, तर भारताने तीन लाखांचा टप्पा गाठला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These three countries have become Coronas new hotspots