काँग्रेसला जे जमले नाही ते आम्ही करुन दाखवले- अमित शाह

They Did Not Have Courage To Implement It We Did Says Amit Shah
They Did Not Have Courage To Implement It We Did Says Amit Shah

नवी दिल्ली - आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदी) सुरू झालेलं राजकारण थांबलेलं नाही. या यादीत तब्बल 40 लाख नागरिकांना अवैध ठरवण्यात आलं असल्यानं विरोधकांनी भाजपाला धारेवर धरलं आहे, याचे पडसाद आज संसदेत उमटले. काँग्रेसनं आसाम करार अंमलात आणण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र भाजपा सरकारनं ते धैर्य दाखवलं, असं अमित शहा राज्यसभेत सांगितले. त्यांच्या या बोलण्यावर काँग्रेस खासदारांनी आक्षेप घेत राज्यसभेत गोंधळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आले होते. 

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचं मूळ काय, हे रजिस्टर कुठून आलं, हे कोणीही सांगत नाही, असेही अमित शहा राज्यसभेत म्हणाले. 'अवैध घुसखोरांच्या प्रश्नावर आसाममधील शेकडो तरुण शहीद झाले. 14 ऑगस्ट 1985 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार लागू केला. हाच करार नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा आत्मा आहे. घुसखोरांची ओळख पटवून त्यांना सिटिजन रजिस्टरमधून वगळून एक नॅशनल रजिस्टर तयार करायचं, अशी सूचना यामध्ये होती. 

घुसखोरांवर कारवाई करण्याच्या घोषणा काँग्रेसने भरपूर केल्या मात्र कारवाईची हिंमत त्यांच्यात नव्हती ही हिंमत आम्ही दाखवली, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेत म्हटले. त्यानंतर, विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. सरकारच्या नोंदींमध्ये कमतरता आहेत फक्त मतपेटीच्या राजकारणासाठी या नोंदी करण्यात आल्या आहेत, असा आरोप विरोधकांनी यावेळी केला. अखेर, काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com