मोदींच्या रॅलीत सहभागी न होणाऱ्यांना देशद्रोही म्हणणारे स्वतःच रॅलीतून गायब

giriraj sinh
giriraj sinh

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये सहभागी न होणारे देशद्रोही असतील. असे बरळणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह स्वतःच मोदींच्या रॅलीमध्ये सहभागी न झाल्याने अडचणीत सापडले आहेत. बिहार मधील पाटणा शहरात रविवारी 3 मार्च ला मोदी यांची संकल्प रॅली होती. या रॅलीला सिंह उपस्थित राहू शकले नाहीत. दोन दिवसापुर्वी नवादा वरून पाटण्याला येताना अस्वस्थ वाटल्याने मोदी यांच्या विशाल रॅलीमध्ये सहभागी होऊ शकलो नसल्याचे ट्ट्विट गिराराज सिंह यांनी केले आहे. त्यांच्या ट्ट्विट नंतर समाज माध्यमातून त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जात आहे. 

या आधिही अनेक वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे सिंह यांनी रॅलीच्या दोन दिवस आधी या रॅलीमध्ये सहभागी न होणार नाही तो देशद्रोही असेल, एवढ्यावरच न थांबता यावरून कोण हिंदूस्थानसोबत आहे आणि कोण पाकिस्तानसोबत हेही स्पष्ट होईल. अशी वल्गणा केली होती. रॅलीमध्ये सहभागी न होणारांना देशद्रोही म्हणणारे गिरीराज सिंह स्वतः कोण आहेत असा उलट प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com