'ते भगवी वस्त्रे घालतात अन्‌ बलात्कार करतात'

वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

"झामुमो'चे नेते हेमंत सोरेन यांची जीभ घसरली

पाकूर (झारखंड) : ते भगवी वस्त्रे घालतात अन्‌ बलात्कार करतात असा सणसाणाटी आरोप झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी केला आहे. आज (ता.१८) देशभरात मुली आणि महिलांना जिवंत जाळले जात आहे. इकडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगवी वस्त्रे घालून फिरताना दिसतात. भाजपची हीच मंडळी फारशी लग्न करीत नाहीत. पण, भगवी वस्त्रे घालून माता-भगिनींची अब्रू लुटण्याचे काम करतात, असे धक्कादायक वक्तव्य झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत बोलताना केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिशेने होता. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद होण्याची शक्‍यता आहे. सध्या झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा अखेरच्या टप्प्यातील प्रचार सुरू असून, आज विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी सभा घेत एकच धुरळा उडवून दिला. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही रांचीमध्ये प्रचार सभा घेत महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर तोफ डागली.

Image result for hemant soren esakal"

आणखी बातम्या वाचा :

आता रेशन दुकानावर स्वस्त दरात मिळणार मटण, चिकन, अंडी अन् मासे ! 

अशाने राज्याची मान खाली जाते; फडणवीसांकडून खोटा व्हिडिओ ट्विट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They wear saffron rape daughters Hemant Sorens shocking remark on BJP leaders