पेट्रोल चोरण्यासाठी खोदला 150फूट लांब बोगदा

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नवी दिल्ली - येथे काल (बुधवार) रात्री इंडियन ऑईलच्या जमिनीखाली जाणाऱ्या पाईमध्ये स्फोट झाला असून, तेथे 150फूट लांब बोगदा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून, या बोगद्याला वॉल फिट करुन चोरटे पेट्रोल चोरी करत होते.

पाईपलाईनमध्ये स्फोट झाला तेव्हा जवळपास एक किलोमीटरच्या परिसरात त्याचा आवज गेल्याचे, तसेच आजूबाजूच्या घरांना देखील धक्का जाणवला. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. सुरुवातील बॉम्ब सोफेट असल्याचे वाटल्याने बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल चोरी प्रकरणी महोम्मद तनवीर याला अटक करण्यात आली असून, त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले. दिल्लीतील सुरज विहार येथेली एनएसआयटी कॉलेज समोरील एक प्लॉट महोम्मदने भंगार सामान ठेवण्यासाठी भाड्याने घेतला होता. या प्लॉटच्या जवळून पेट्रोलची पाईपलाईन गेली होती. महोम्मद आणि त्याच्या साथीदारांनी मिळून हा बोगदा खोदून त्यावर भंगार सामान ठेवले होते.

Web Title: Thieves dig tunnel to steal petrol from Indian Oil pipeline, exposed after blast