इथे चक्क म्हशींसाठी मागितली जातेय खंडणी!

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

म्हशींना पळवून नेऊन त्यांच्या सुटकेसाठी खंडणी घेण्याच्या प्रकाराला खोऱ्यातील स्थानिक भाषेत 'पनिहाई' म्हणतात.

भोपाळ : मोठ्या माणसांना किंवा लहान मुलांना पळवून नेऊन त्यांच्या सुटकेसाठी खंडणी मागण्याचे गुन्हे होत असतात, पण आता त्यात चक्क म्हशींची भर पडली आहे... म्हशी पळवून नेऊन त्यांच्या सुटकेसाठी मालकांकडून खंडणी मागण्याची शक्कल चंबळ खोऱ्यातील गुन्हेगारांनी लढविली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दरोडेखोरांसाठी पूर्वी कुख्यात असलेले चंबळचे खोरे आता गुरे चोरांमुळे गाजायला लागले आहे. म्हशींना पळवून नेऊन त्यांच्या सुटकेसाठी खंडणी घेण्याच्या प्रकाराला खोऱ्यातील स्थानिक भाषेत 'पनिहाई' म्हणतात. म्हणजे, म्हशीच्या सुटकेसाठी मध्यस्थामार्फत मागितलेली रक्कम गुन्हेगारांपर्यंत पोचविणे. म्हशीच्या किमतीच्या 30 टक्के रक्कम खंडणी म्हणून द्यावी लागते. गुरेचोर, त्यांचे दलाल आणि त्यांच्या आश्रयदात्यांच्या मजबूत साखळीपुढे पोलिसही काही करू शकत नाहीत. शिवाय अशा अनेक गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे होत नाही. 

- बॉम्बस्फोटातील 'हा' आरोपी भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर 

गुरे चोरून नेणारे कोण आहेत हे माहिती असूनही दबावामुळे काही करता येत नसल्याची उदाहरणे या परिसरात आहेत. सिरमिती नावाच्या गावात एका महिलेची साठ हजार रुपये किमतीची म्हैस चोरांनी पळवून नेली. गावातील तीन जणांवर या महिलेचा संशय होता आणि तिने त्यांची नावेही पोलिसांना दिली; पण काहीच झाले नाही. नंतर या महिलेने या तिघांविरुद्ध गावपंचायतीकडे तक्रार केली.

- बॉलिवूडच्या 'या' चित्रपटात दिसणार नागार्जुन ; 15 वर्षांनंतर कमबॅक!

पंचायतीपुढे या तिघांनी या महिलेला तिची म्हशी परत करण्याचे आश्‍वासन दिले; पण खंडणीच्या रकेमवरून वाद सुरू आहे. सिंगपुरा येथील एकाची साठ हजार रुपयांची म्हैस पळवून नेण्यात आली. तक्रार करून काही उपयोग न झाल्यामुळे संबंधिताने अखेर दलालामार्फत चोरांना वीस हजार रुपये देऊन म्हैस घरी आणली. 

- Panipat : सदाशिवरावभाऊ विरूद्ध अहमद शाह अब्दाली; गाजणार मोठी लढाई

गुरे चोरणाऱ्यांची माहिती गोळा करण्याचा आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. 
- डॉ. असित यादव, पोलिस अधीक्षक, मुरैना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thieves had abducted buffaloes and demand for a ransom in Bhopal