तृतीयपंथीयांनी घेतले अय्यप्पाचे दर्शन

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

शबरीमला (केरळ) : शबरीमला देवस्थानात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तेथे हिंसक आंदोलन झाल्याने अद्याप एकही महिला दर्शन घेऊ शकलेली नाही. याच वेळी मात्र चार तृतीयपंथीयांनी भगवान अय्यप्पाच्या दर्शनाचा लाभ मंगळवारी घेतला. 

अनया, तृप्ती, रेन्जुमोल आणि अवंतिका या तृतीयपंथीयांना मंदिराकडे जाण्यापासून आधी रोखण्यात आले होते. मात्र आज त्यांनी प्रचंड पोलिस बंदोबस्तात अय्यप्पा देवाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी परंपरेनुसार काळी साडी परिधान केली होती व देवाला वाहण्यासाठी "इरुमुडीकेट्टु'चा प्रसाद डोक्‍यावर घेतला होते. त्यांना निलाक्कल ते पम्बा व शबरीमला डोंगर चढताना पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. मंदिरात प्रवेश करून दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने आनंद झाला असून, आयुष्याचे ध्येय पूर्ण झाल्याने समाधान वाटत आहे,'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

तृतीयपंथीयांना मंदिरात प्रवेशासंबंधी कायदेशीर अडचणी असल्याचे कारण देऊन त्यांना परत पाठविण्यात आले होते. त्यावर तृतीयपंथीयांच्या या गटाने पोलिस महासंचालक ए. हेमाचंद्रन यांना व पोलिस महानिरीक्षक मनोज अब्राहम यांची भेट सोमवारी (ता. 17) घेतली होती. त्यानंतर त्यांना पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली.

Web Title: Third Genders gets Darshan of Ayyappa