पेट्रोल खरेदी करणारे उपाशी मरत नाहीत - अल्फॉन्स कन्ननथनम

वृत्तसंस्था
रविवार, 17 सप्टेंबर 2017

... म्हणून दर वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती कोसळल्या असतानाही केंद्र सरकार मात्र पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी करायला तयार नाही. विविध राज्य सरकारेही पेट्रोलवर व्हॅट लावून अतिरिक्त कमाई करत असल्याने इंधनाचे दर भडकले आहेत. विशेष म्हणजे केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती ५३ टक्‍क्‍यांनी कमी झाल्या आहेत; पण याच वेळी देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या भावामध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे.

तिरुअनंतपुरम - पेट्रोल, डिझेल दरवाढीची सर्वसामान्यांना मोठी झळ सोसावी लागत असताना केंद्रीय मंत्री मात्र याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फॉन्स कन्ननथनम यांनी इंधन दरवाढ योग्य असल्याचे सांगितले. कार आणि मोटारसायकल चालविणारेच पेट्रोल खरेदी करतात. पेट्रोल खरेदी करणारी मंडळी उपाशी तर मरत नाहीत ना, असे संतापजनक वक्तव्य त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

ते म्हणाले, की ‘‘ इंधन दरवाढीचा निर्णय पूर्ण विचारांतीच घेण्यात आला आहे. जी मंडळी कर भरू शकतात त्यांनी तो भरायला हवा. इंधनाची दरवाढ न परवडायला चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांकडे पैशांची कमी आहे का? ही मंडळी नक्कीच उपाशी राहत नसतील. सरकार गरिबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. अनेक गावांमध्ये वीज, निवारा आणि शौचालयांसारख्या सुविधा पोचवायच्या आहेत. या सर्व उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. त्यामुळेच सरकार श्रीमंतांवर जास्त कर आकारते आहे. आम्ही हा सगळा पैसा कराच्या रूपाने गोळा करतो आहे, तो काही आम्ही चोरत नाही.’’ दरम्यान, देशभर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होऊ लागल्याने महागाईच्या झळाही अधिक तीव्र झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पेट्रोलचे दर बुधवारी लिटरला ७९ रुपये ४८ पैशांवर गेले होते. अनेक ठिकाणांवर हे दर ८१ रुपयांच्याही पुढे गेले आहेत.

... म्हणून दर वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती कोसळल्या असतानाही केंद्र सरकार मात्र पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी करायला तयार नाही. विविध राज्य सरकारेही पेट्रोलवर व्हॅट लावून अतिरिक्त कमाई करत असल्याने इंधनाचे दर भडकले आहेत. विशेष म्हणजे केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती ५३ टक्‍क्‍यांनी कमी झाल्या आहेत; पण याच वेळी देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या भावामध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे.

Web Title: thiruvananthapuram national news The starving petrol does not die