...तर न्यायालयाविरोधात बोलणाऱ्यांवर होणार कारवाई

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

गौरव भाटिया यांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या टि्वटचा दाखल दिला आहे. काही ट्विट असे आहेत, की ते न्यायालयात दाखवताही येऊ शकत नाहीत. तसेच वकिल आणि नेत्यांच्या विरोधात अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, याबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या विरोधात पुराव्यांअभावी न्यायालयाकडून निर्णय दिला जातो. हा निर्णय दिला जात असताना न्यायालयाच्या विरोधात अनेक वक्तव्ये केली जातात. मात्र, यापुढे न्यायालयाविरोधात अशी वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.   

न्यायालयाविरोधात चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वकील आणि भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी याचिका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेली ही याचिका स्वीकारली आहे. या याचिकेमध्ये भाटिया यांनी आरोप केले, की काही वकील आणि राजकारणी सोशल मीडिया आणि वृतवाहिन्यांवर न्यायालयाविरोधात चुकीचे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे यावर लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पावले उचलली जावी. 

Supreme Court

गौरव भाटिया यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाच्या समक्ष प्रकरणाचा दाखला देत सांगितले, की काही ज्येष्ठ वकील आणि नेते सार्वजनिकरित्या न्यायपालिका आणि न्यायालयाविरोधात बोलत आहेत. न्यायालयाने यावर लक्ष द्यायला हवे. दाखल केलेल्या या याचिकेवर खंडपीठाकडून मंगळवारी सुनावणी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

गौरव भाटिया यांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या टि्वटचा दाखल दिला आहे. काही ट्विट असे आहेत, की ते न्यायालयात दाखवताही येऊ शकत नाहीत. तसेच वकिल आणि नेत्यांच्या विरोधात अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, याबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांची ही याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे यापुढे न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाण्याची शक्यत आहे. 

Web Title: Those Who Speak Against The Judiciary Will Take Action Petition Filed In The Supreme Court Against the same