SBI ने एकच अकाऊंट नंबर दिला दोघांना; एकाने पैसे भरले अन् दुसऱ्याने...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

मोदींनी पैसे खात्यात टाकले?

- तीन टप्प्यात पैसे करणार परत

भिंड (मध्य प्रदेश) : भारतीय स्टेट बँकेने एकच अकाऊंट नंबर दोन खातेदारांना दिला. मात्र, एकाने खात्यात पैसे जमा केले. तर दुसऱ्या खातेदाराने मोदींनी पैसे दिल्याचे समजून अकाऊंटमधील 89 हजारांची रक्कम काढून घेतली. ही घटना मध्यप्रदेशच्या भिंड परिसरात घडली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पंतप्रधान मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी पैशांबाबत काही आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनाचा भाग म्हणून आपल्या खात्यात पैसे आल्याचे संबंधित खातेदाराला वाटले. त्यामुळे त्याने आपल्या अकाऊंटमधून काही रक्कम काढली.

मध्य प्रदेशमध्ये स्टेट बँकेची आलमपूर शाखा आहे. या शाखेतून दोन खातेदारांना एकच अकाऊंट नंबर देण्यात आला. बँकेकडून देण्यात आलेल्या पासबुकवरही अकाऊंट नंबर एकच असल्याचे दिसत आहे. यातील एक खातेदार बँकेत पैसे टाकत राहिला तर दुसरा खातेदार (ज्याचा अकाऊंट नंबर सारखाच होता) बँकेतून पैसे काढत राहिला. हा प्रकार जवळपास सहा महिन्यांपर्यंत सुरु राहिला. एका खातेदाराने 89 हजार रुपये बँकेत भरले. तर दुसऱ्या खातेदाराने ते पैसे काढले. याची माहिती संबंधित खातेदाराला समजली तेव्हा त्याने बँकेच्या व्यवस्थापकाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर बँक व्यवस्थापकही चांगलेच विचारात पडले.

नव्या आघाडीचं ठरलं!

आलमपूरच्या रुरई गावातील हुकूमसिंह कुशवाह यांचे पुत्र हरविलास कुशवाह हरियाणात काम करत आहेत. कुशवाह यांचे अकाऊंट आलमपूर शाखेत आहे. त्यांनी 12 नोव्हेंबर 2018 रोजी पासबुक देण्यात आले. अकाऊंट उघडल्यानंतर हुकूम हरियाणा येथे गेले. तेथून ते बँकेत पैसे जमा करत होते. मात्र, जेव्हा ते पुन्हा आपल्या गावी आले. त्यांनी 16 ऑक्टोबरला पासबुक अपडेट केले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांना त्यांच्या अकाऊंटमध्ये फक्त 35 हजार रुपये असल्याचे दिसले. 7 डिसेंबर 2018 पासून 7 मे 2019 दरम्यान विविध खात्यामध्ये 89 हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. 

संजय राऊत म्हणतात, हम बुरे ही ठीक है

तसेच बँकेकडून दुसऱ्या व्यक्तीलाही तोच अकाऊंट नंबर दिला गेला. रोनी गावातील रहिवासी असलेल्या हुकूमसिंह बघेल यांचे पुत्र रामदयाल बघेल यांनाही तोच अकाऊंट नंबर दिला गेला. बघेल यांना 23 मे, 2016 मध्ये पासबुक देण्यात आले होते. 

तीन टप्प्यात पैसे करणार परत

एकच अकाऊंट नंबर असलेल्या रामदयाल बघेल यांनी 89 हजार रुपयांची रक्कम बँकेतून काढली. आता ही काढलेली रक्कम कुशवाह यांना तीन टप्प्यात परत करणार असल्याचे सांगितले. 

मोदींनी पैसे खात्यात टाकले?

मोदींनी पैसे दिल्याचे वाटत असल्याने बँक खात्यातून पैसे काढण्यात आले. या पैशातून आम्ही घराचे काम करण्याचे ठरवले. त्यानुसार हे पैसे खर्च केल्याचे बघेल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thought PM Narendra Modi Was Giving Money Curious Case Of 2 Men One SBI Account