बेकायदा दारूप्रकरणी तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

बेकायदा दारूप्रकरणी महाराष्ट्राच्या तिघांना मडगाव येथे अटक करण्यात आली आहे. मडगाव पोलिसांनी मालभाट-मडगाव येथील व्हिक्टर इस्पितळाजवळ छापा टाकून सुमारे विनापरवाना असलेल्या 220 मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी महाराष्ट्रातील सचीन घोटाळे, सुरेश यादव व स्वप्नील जावळेकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मडगांव - बेकायदा दारूप्रकरणी महाराष्ट्राच्या तिघांना मडगाव येथे अटक करण्यात आली आहे. मडगाव पोलिसांनी मालभाट-मडगाव येथील व्हिक्टर इस्पितळाजवळ छापा टाकून सुमारे विनापरवाना असलेल्या 220 मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी महाराष्ट्रातील सचीन घोटाळे, सुरेश यादव व स्वप्नील जावळेकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या मद्याची किंमत सुमारे दहा हजार रुपये आहे. गोव्यातून महाराष्ट्रात ही दारू तस्करी करण्याच्या रॅकेटमध्ये ही टोळी गुंतली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Web Title: three areested in goa