गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करणाऱ्या तिघांना बेळगावमध्ये अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा हिरेबागेवाडी पोलिसांनी हलगा येथे केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 13 हजार रुपयांची गांजाची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.

बेळगाव : बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करणाऱ्या तिघांना बेळगावमध्ये अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा हिरेबागेवाडी पोलिसांनी हलगा येथे केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 13 हजार रुपयांची गांजाची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.

चेतन अशोक कुरंगी (वय 20, रा. हलगा), अनिल रामा चौगुले (वय 21 रा. हलगा), रुद्राप्पा भिमाप्पा येळगनावर ( वय 35 रा. हनिकेरी ता. बैलहाँगल) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. त्यांना गांजा पुरविणारा दोडवाड ता. बैलहोंगल येथील पुंडलिक हनुमंतप्पा काळे (वय 65) याच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. हलगा येथे काहीजण बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करत आहेत अशी माहिती बेळगाव ग्रामीण उपविभागाचे सहआयुक्त भालचंद्र बी. एस. याना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल रात्री हलगा येथे धाड टाकून वरील तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 13 हजार रुपये किमतीची गांजाची पाकिटे व नशीली बियाणे जप्त करण्यात आली आहेत.

शहर आणि उपनगरात अमली पदार्थांची खुके आम विक्री केली जात आहे. या बाबत विधानसभेत आवाज उठविण्यात आला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या बेळगाव पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे.

Web Title: Three arrested for selling ganja in belgum

टॅग्स