मराठा आरक्षण मोर्चा हल्ल्यातील नवी मुंबईतील तिघांना गोव्यात अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

निरीक्षक दळवी यांनी दिेलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा व आंदोलने सुरू असताना अनेक संशयित या जमावामधील लोकांवर हल्ला करण्यात सहभागी झाले होते.

गोवा - कोपरखैरणे-नवी मुंबई येथील मराठा आरक्षण मोर्चाप्रकरणी खून व इतर गुन्हेप्रकरणातील फरारी असलेल्या तिघाजणांना कळंगुट पोलिसांनी अटक करून त्याना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंबई पोलिस आज या तिघा संशयितांना घेऊन मुंबईला रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. 

कळंगुट पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे भूषण भगवान आगसकर, आशिष काले व चंद्रशेखर विश्वनाथ पाटील अशी असून ते सर्वजण कोपरखैरणे - नवी मुंबई येथील रहिवासी आहेत. 

निरीक्षक दळवी यांनी दिेलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा व आंदोलने सुरू असताना अनेक संशयित या जमावामधील लोकांवर हल्ला करण्यात सहभागी झाले होते. याप्रकरणी 25 जुलै 2018 रोजी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात खून, जमावबंदी या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी काही संशयितांची ओऴख पटवून त्यांची धरपकड सुरू केल्यावर या तिघांनी गोव्यातील कळंगुट समुद्रकिनारी भागात छुपण्यासाठी आसरा घेतला होता. नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचने कळंगुट पोलिसाशी संपर्क साधून या तिघा संशयितांची छायाचित्रे तसेच माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे निरीक्षक जिवबा दळवी यांनी पोलिस पथकाच्या मदतीने हे संशयित राहत असलेल्या हॉटेलवर छापा टाकण्याच्या तयारीत असलेल्या असलेल्या पोलिसांना पाहून या संशयितानी तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून कळंगुट समुद्रकिनारी परिसरात ताब्यात घेतले.  संशयितांना अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसाना आज पहाटे दिल्यानंतर त्यांना गोव्यात येऊन त्याना ताब्यात घेतले व मुंबईला घेऊन गेले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Three cops From Navi Mumbai are arrested who involved in Maratha Reservation Morcha in Goa