भारत-उझबेकिस्तान दरम्यान संरक्षणविषयक तीन करार

ताशकंद - भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि त्यांचे उझबेकिस्तानचे समकक्ष बखोदीर निझामोविच कुर्बानोव्ह यांनी द्वीपक्षीय सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
ताशकंद - भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि त्यांचे उझबेकिस्तानचे समकक्ष बखोदीर निझामोविच कुर्बानोव्ह यांनी द्वीपक्षीय सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

नवी दिल्ली - सुरक्षाविषयक सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत तीन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

संरक्षण मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, उझबेकिस्तानचे संरक्षणमंत्री मेजर जनरल बखोदीर निझामोविच कुर्बानोव्ह आणि राजनाथसिंह यांच्यात शनिवारी द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत द्विपक्षीय संरक्षण सहाकार्यात वाढ करण्यावर भर देण्यात आला होता. त्यासाठीच्या तीन करारांवर राजनाथसिंह आणि कुर्बानोव्ह यांनी स्वाक्षऱ्या केल्या. 

दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेवेळी दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये लष्करी औषधांच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात पुढील काही काळात तज्ज्ञांच्या पातळीवर चर्चा सुरू ठेवण्यात येणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारत आणि उझबेकिस्तानच्या लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्येही या वेळी सहकार्य करार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

उझबेकिस्तानची राजधानी ताशकंदमध्ये शांघाई सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांच्या बैठकीचे एक व दोन नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून राजनाथसिंह हे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com