त्या तीन बहिणींचा उपासमारीने बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील तीन निष्पाप मुलींचा कुपोषण आणि उपासमारीमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. अनेक दिवसांपासून त्यांना जेवण मिळाले नव्हते. रुग्णालयाने दिलेल्या  वैद्यकीय अवहालात कुपोषण आणि उपासमार त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील तीन निष्पाप मुलींचा कुपोषण आणि उपासमारीमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. अनेक दिवसांपासून त्यांना जेवण मिळाले नव्हते. रुग्णालयाने दिलेल्या  वैद्यकीय अवहालात कुपोषण आणि उपासमार त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

शिखा (वय 8 वर्ष) मानसी (वय 4 वर्ष), पारुल (वय 2 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे असून, या तीनही मुली सख्ख्या बहिणी होत्या. या प्रकरणात डॉक्टरांनी दुसऱ्यांदा त्यांचे पोस्टमॉर्टम केले. त्यात त्यांच्या पोटात अन्नाचा कनही नसल्याचे उघडकीस आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार, मागील सात ते आठ दिवसापासून त्यांना जेवण मिळाले नाही. त्यामुळेच त्यांची प्रकृती खालावली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. 

या प्रकरणाची दखल घेऊन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मुलींच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुलींची आई विणा सिंह यांची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यात वडिल मंगल सिंह मागील अनेक दिवसांपासून कामाच्या शोधात घराबाहेर पडले होते. अशात मुलांनी मागील अनेक दिवसांपासून जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. तरिही त्यांच्यावर कोणतेही उपचार न करता त्यांना घरातच ठेवण्यात आले. या काळात त्यांना जेवणही देण्यात आले नाही. असे मुलींच्या आईनेच सांगितले. 

मंगल सिंह रिक्षा चालविण्याचे काम करत होते. परंतु, काही दिवसांपुर्वी त्यांची रिक्षा चोरीला गेली होती. त्यामुळे घरमालकाने त्याला घराबाहेर काढले. मग त्यांचा मित्र नारायण यादव यांच्याकडे कुटुंबाला सोडवून मंगल सिंह कामाच्या शोधात घराबाहेर पडले होते. मंगळवारी पहाटे यादव त्यांच्या घरी गेले असता मुली बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. यादव यांनी शेजारच्यांच्या मदतीने तिन्ही मुलींना लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. असे नारायण यादव यांनी सांगितले.

सरकारवर निशाना
संसदेपासून काही किलोमीटर अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे अनेक सामाजिक संघटनांनी सरकारवर निशाना साधत जोरदार टिका केली. ही अतिशय लाजिरवणी घटना असून, संसदेपासून काही अंतरावर असे घडत असेल तर सरकारला याची लाज वाटली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण समिती असते, जिथे मुलांच्या शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सुरक्षेवर लक्ष ठेवते. ही संरक्षण समिती काय करत आहे. अशी टिका बचपण बचाओ आंदोलनाचे संचालक राकेश सेंगर यांनी केली.
  

Web Title: Three Delhi sisters died of ‘severe malnutrition’