
Three Elephants Electrocuted : शेतीच्या कुंपणाने घेतला ३ हत्तीनींचा जीव; शेतकऱ्याला अटक
रानडुकरांपासून आपले पीक वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने लावलेलं कुंपनाने तीन हत्तींचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याने विजेचे बेकायदेशीर कुंपण घातले होते. मंगळवारी तीन हत्तींनी हेच कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.
तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील मरंदहल्ली येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदेशीरपणे विद्युत कुंपण बसवल्याप्रकरणी एकास अटक केली आहे.
मुरुगन नावाच्या शेतकऱ्याने रानडुकरांचे हल्ले रोखण्यासाठी बेकायदेशीरपणे विद्युत कुंपण लावले होते. यादरम्यान शेत ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना हत्ती विद्युत तारांच्या संपर्कात आले. शेतमालक मुरुगन याला पोलिसांनी अटक केली आहे.
तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सतर्क करण्यात आले, त्यांनी वीज कनेक्शन तोडले.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मादी हत्तींचे वय सुमारे 30 वर्षे आहे. वन अधिकाऱ्यांनी आयएएनएसला सांगितले की विभाग अंदाजे नऊ महिन्यांच्या शावकांना इतर कळपांसह पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहे.