MCD निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का; CM केजरीवालांच्या तीन माजी आमदारांचा भाजपात प्रवेश

'पंतप्रधान मोदींच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या संकल्पनेनं प्रभावित होऊन या तिन्ही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.'
Aam Aadmi Party MLAs join BJP
Aam Aadmi Party MLAs join BJPesakal
Summary

'पंतप्रधान मोदींच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या संकल्पनेनं प्रभावित होऊन या तिन्ही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.'

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या (Delhi Municipal Election) मतदानाच्या अवघ्या पाच दिवस आधी भाजपनं आम आदमी पार्टीला (Aam Aadmi Party) मोठा धक्का दिलाय. आम आदमी पक्षाचे माजी आमदार कमांडो सुरेंद्र सिंह यांनी आपला पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता, माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्या उपस्थितीत त्यांनी सदस्यत्व स्वीकारलं. 2008 मध्ये मुंबईत (Mumbai) झालेल्या दहशतवादी घटनेत दहशतवाद्यांशी लढताना कमांडो सुरेंद्र सिंह जखमी झाले होते. दिल्लीतील कँट भागातून ते आम आदमी पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले.

Aam Aadmi Party MLAs join BJP
NDTV बोर्डात अदानी समूहाची एन्ट्री; संचालक प्रणय रॉय, राधिका रॉय यांचा राजीनामा

कमांडो सुरेंद्र सिंह यांच्याशिवाय त्रिलोकपुरी मतदारसंघाचे माजी आमदार राजू धिंगाण आणि गोकलपूरचे माजी आमदार चौधरी फतेह सिंह यांनीही मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आम आदमी पक्षाच्या तीन माजी आमदारांना सदस्यत्व दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या संकल्पनेनं प्रभावित होऊन या तिन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप परिवारात सर्वांचं स्वागत आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com