छत्तीसगडमध्ये चकमक म्होरक्‍यासह तीन ठार 

पीटीआय
बुधवार, 30 मे 2018

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त राजनंदगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सुरक्षा दलाच्या झालेल्या चकमकीत नक्षलवाद्याचा म्होरक्‍या आणि त्याच्या दोन समर्थकांना ठार केले. ही घटना बोरलतलाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंडियागिरी पर्वतरांगातील जंगलात घडली.

राजनंदगाव (छत्तीसगड) - छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त राजनंदगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सुरक्षा दलाच्या झालेल्या चकमकीत नक्षलवाद्याचा म्होरक्‍या आणि त्याच्या दोन समर्थकांना ठार केले. ही घटना बोरलतलाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंडियागिरी पर्वतरांगातील जंगलात घडली.

घटनास्थळावरून दोन शस्त्रेही जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाच्या नक्षलविरोधी पथकाने चंडियागिरी पर्वतरागांच्या जंगलात तपास मोहीम सुरू केली होती. त्या वेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याचवेळी पोलिसांनी देखील नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. बराच वेळ गोळीबार चालू होता. त्यानंतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. घटनास्थळाची तपासणी केली असता तेथे दर्रेकसा भागाच्या कमिटीचा डेप्युटी कमांडर आझाद आणि दोन नक्षलसमर्थकांचे मृतदेह आढळून आले.

Web Title: Three killed in Chhattisgarh