सेल्फी घेताना तिघांचा मृत्यू; दुचाकी भिंतीवर आदळली

Road Accident
Road AccidentRoad Accident

सकाळ डिजिटल टीम

सेल्फी घेताना दुचाकी भिंतीवर आदळून तीन तरुणांचा जागीच मृत्यू (Three killed while taking selfie) झाला तर चौथ्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला पाटणा येथे रेफर करण्यात आले. ही घटना रविवारी नालंदा जिल्ह्यातील चांडी पोलिस स्टेशन हद्दीतील कोएल बिघा मोरजवळ घडली. सोनू कुमार (१८), रोशन कुमार (२१) आणि चंद्रकांत कुमार (१८) सर्व राहणार सिक्रिया अशी मृतांची नावे आहेत. तर चंदन कुमार (रा. भूपर) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आणि मृत तरुण पार्ट्यांमध्ये लौंडा डान्सचे काम करायचे. दुचाकीवरून चारही तरुण हरनौतकडे जात होते. चालत्या बाईकवर एक तरुण दुसऱ्या नाचणाऱ्या तरुणासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत होता. भरधाव वेगामुळे (Road Accident) दुचाकी बाबा चौहरमल मंदिराच्या भिंतीला (Bike hit the wall) धडकली. यातच तिघांचा घटनास्थळी मृत्यू (Three killed while taking selfie) झाला, तर एक जखमी झाला.

Road Accident
डिझेलच्या दरात २५ रुपयांनी वाढ; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

उपस्थित नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. तसेच जखमीला उपचारासाठी पाठवले. शनिवारी रात्री गावात लौंडा नृत्य झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रविवारी तरुण दुचाकीवरून घरी जात होते. अपघातानंतर सिक्रिया गावात एकच गोंधळ उडाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com