अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

गुडगाव- दहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर हत्या करणाऱया तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझिराबाद गावातील झोपडपट्टीमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी 16 जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. सरस्वती कुंज येथे सुरू असलेल्या इमारतीखाली 24 जानेवारी रोजी तिचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर प्रत्यक्षदर्शिंनी एक काळ्या रंगाची स्कोडा मोटार पाहिल्याचे सांगितले होते. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मोटार व तिच्या मालकाचा शोध घेण्यात यश आले. मोटारीच्या मालकाकडे तपास केल्यानंतर इजाझ मलिक (वय 26) मुख्तार अली (वय 30) व जलिल अहमद (वय 22) या तिघांना अटक करण्यात आली.

तिघांनाही आमलीपदार्थांचे व्यसन आहे. मोटारीमधून ते दिवसभर मुलींचा शोध घेत होते. झोपडपट्टीमधून अल्पवयीन मुलीला उचलून ते घेऊन गेले होते. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला होता, असे चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले.

Web Title: Three men who tortured, gang raped, killed 10-year-old girl arrested

टॅग्स