esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

अनैतिक संबंध समोर येताच तिघांनी केला एकमेकांचा खून

sakal_logo
By
सुधीर काकडे

गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधामध्ये मध्ये होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेत प्रेम प्रकरणात तिघांना आपला जीव गमवावा लागल्याचे समजते आहे. रांचीमध्ये घडलेल्या या घटनेत विचित्र पद्धतिने तीन खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तीन मृतांमध्ये एका विवाहित दाम्पत्याचा समावेश असून, अनैतिक संबंधांमुळे हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

रांचीमधील खलारी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत, तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, धक्कादाय प्रकार समोर आला आहे. सेंट्रल कोल फिल्डमध्ये काम करणारा कर्मचारी असलेल्या देव प्रसाद, त्याची पत्नी कौशल्यादेवी आणि प्रकाश चौहान या तिघांनी एकमेकांचा खून केल्याचे हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तामधून समोर आले आहे.

हेही वाचा: पती-पत्नीची आत्महत्या; गळफास घेण्याआधी ३ मुलांना पाजलं विष

मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेत रांचीमधील मोहन नगरमध्ये असलेल्या देव प्रसाद आणि कौशल्यादेवी यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. प्रकाश चौहान हा त्या रात्री धारदार शस्त्र घेऊन पोहोचला होता. यावेळी तिघांचेही मोठे भांडण झाले आणि तिघांनीही एकमेकांची हत्या केली. काही तरी घडल्याची शंका येताच शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस घटना स्थळी पोहोचले असता कौशल्यादेवी आणि प्रसाद मृत अवस्थेत आढळून आले, तर देव प्रसादला रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. कौशल्यादेवीची लहान मुलगी या घटनेत जखमी अवस्थेत आढळून आली आहे.

हेही वाचा: विवाहित महिलेसह प्रियकराची गावकऱ्यांनी काढली विवस्त्र धिंड

पोलिसांनी केलेल्या तपासात प्रकाशचे मृत महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. मंगळवारी रात्री, प्रकाश देव प्रसाद यांच्या घरी पोहोचल्यानंतर तिघांमध्ये भांडण झाले आणि त्यांनी एकमेकांना मारले. मृत झालेल्या दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीलाही रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहीती रांची (ग्रामीण) पोलीस अधीक्षक नौशाद आलम यांनी दिली आहे.

loading image
go to top