Vande Bharat : पुढील वर्षीपर्यंत देशात धावणार तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन, रेल्वे मंत्र्यांनी सांगितली योजना

येत्या तीन ते चार वर्षांमध्ये देशातील रेल्वे रुळही अपटेड करण्यात येणार आहेत, असं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressEsakal

देशात सध्या विविध ठिकाणी वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. हायटेक फीचर्स आणि सुपरफास्ट वेग यामुळे ही एक्स्प्रेस अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. यातच आता, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षीपर्यंत देशात तीन प्रकारच्या वंदे भारत रेल्वे धावतील असं ते म्हणाले.

वंदे भारतचे तीन प्रकार पुढील वर्षीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत लाँच करण्यात येणार आहे, असं वैष्णव म्हणाले. यामध्ये वंदे चेअर कार, वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपर अशा तीन रेल्वेंचा समावेश असेल. शताब्दी, राजधानी आणि लोकल ट्रेन्सची जागा या नवीन एक्स्प्रेस घेतील असंही ते यावेळी म्हणाले.

Vande Bharat Express
'वंदे भारत' म्हणजे रुळांवरचा कम्प्युटरच! पाहा कशी काम करते ही स्वदेशी हायटेक ट्रेन

काय असेल फरक

या तीन रेल्वेंबाबत अधिक माहिती देताना वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) म्हणाले, की १०० किलोमीटर पेक्षा कमी अंतरासाठी वंदे मेट्रो ही रेल्वे लाँच केली जाईल. वंदे चेअर कार ही १०० ते ५५० किलोमीटर एवढ्या अंतरासाठी असेल. तर, ५५० किलोमीटर पेक्षा अधिक दूरच्या प्रवासासाठी वंदे स्लीपर ही रेल्वे असणार आहे.

सर्व राज्यांमध्ये वंदे भारत

वैष्णव यावेळी म्हणाले, की जूनच्या मध्यापर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी याची निर्मिती वेगाने होत आहे. दर आठ ते नऊ दिवसांमध्ये या कारखान्यांतून एक नवीन रेल्वे तयार होऊन येत आहे. तसेच, ही वंदे भारत बनवण्यासाठी आणखी दोन कारखान्यांची निर्मिती सुरू आहे.

रेल्वेचे रुळ होणार अपडेट

सध्या वंदे भारत एक्स्प्रेसची क्षमता १६० किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याची आहे. मात्र, देशातील रेल्वे रुळांच्या क्षमतेनुसार, ती १३० किमी प्रतितास या वेगाने चालवण्यात येते. त्यामुळे येत्या तीन ते चार वर्षांमध्ये देशातील रेल्वे रुळही अपटेड करण्यात येणार आहेत, असं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यामुळे वंदे भारत या त्यांच्या पूर्ण क्षमतेने वापरण्यात येतील.

Vande Bharat Express
9 Years of Modi Govt : मोदींच्या ९ वर्षात देश कसा बनला 'डिजिटल इंडिया'? हे सहा निर्णय ठरले महत्त्वाचे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com