रायपूर येथेही गोरखपूर घटनेची पुनरावृत्ती?;तीन बालके मृत्युमुखी

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

ऑक्‍सिजन पुरवठ्याची जबाबदारी असलेला अधिकारी हा यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने या बालकांचा मृत्यु ऑक्‍सिजन अभावी झाला नसल्याचा दावा केला आहे

रायपूर - छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये प्राणवायुच्या अभावामुळे तीन नुकतीच जन्म झालेली बालके मृत्युमुखी पडल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. याचबरोबर ऑक्‍सिजन पुरवठ्याची जबाबदारी असलेला अधिकारी हा यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने या बालकांचा मृत्यु ऑक्‍सिजन अभावी झाला नसल्याचा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये ऑक्‍सिजन अभावी 70 बालके मृत्युमुखी पडल्याच्या दुर्दैवी घटनेचे पडसाद उमटत असतानाच रायपूर येथेही तीन बालके मृत्युमुखी पडली आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी 

Web Title: Three Newborns Die In Govt Hospital In Raipur Due To Drop In Oxygen Supply