महाराष्ट्रात काँग्रेसकडे एका मतदारसंघात तीन पर्याय; सात उमेदवार निश्चित!

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 जानेवारी 2019

सात उमेदवार निश्चित
सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), मुकूल वासनिक (रामटेक), विद्यमान खासदार राजीव सातव (हिंगोली), माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे (यवतमाळ), चारुलता टोकस (वर्धा), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) , अमिता चव्हाण (नांदेड) या एकमेव नावांची शिफारस करण्यात आली असल्याने हे सात उमेदवार काँग्रेसकडून निश्चित झाले आहेत.

पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जिल्हा समित्यांकडून उमेदवारांच्या नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गेल्या वेळी काँग्रेसने लढविलेल्या 26 मतदारसंघांमधील नावांची शिफारस काँग्रेस समितीला करण्यात आली होती. या समितीने एका मतदारसंघासाठी तीन पर्यायाची शिफारस हायकमांडकडे केली आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांना राज्याच्या राजकारणात परतायचे असल्याने त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यात रस नाही. त्याऐवजी चव्हाण यांच्या पत्नीच्या नावाची शिफारस नांदेड काँग्रेसने केली आहे. अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय राहुल गांधी हेच घेतील, असे सांगण्यात आले.

सात उमेदवार निश्चित
सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), मुकूल वासनिक (रामटेक), विद्यमान खासदार राजीव सातव (हिंगोली), माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे (यवतमाळ), चारुलता टोकस (वर्धा), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) , अमिता चव्हाण (नांदेड) या एकमेव नावांची शिफारस करण्यात आली असल्याने हे सात उमेदवार काँग्रेसकडून निश्चित झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three options for congress in Maharashtra Seven candidates are sure