J&K : बारामुल्ला येथे चकमकीत 3 दहशतवादी ठार; पोलीस शहीद

सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीर दलाचा एक पोलिसही शहीद झाला.
 J&K
J&KSakal

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना (Terrorist) कंठस्नानी पाठविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीर दलाचा एक पोलिसही शहीद झाला. (Baramulla Encounter Three Terrorists Killed)

दहशतवादी मोठा हल्ल्याच्या तयारीत

जम्मू-काश्मीर पोलीस आणि 52 आरआरच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सतर्कता बाळगत सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. तर एक पोलीस शहीद झाला आहे. दरम्यान, ठार मारण्यात आलेले तीन्ही दहशतवादी गुलमर्गमध्ये (Gulmarg) तीन-चार महिन्यांपासून सक्रिय होते आणि ते मोठ्या हल्ल्याच्या (Terrorist Attack) तयारीत होते, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी यांनी दिली आहे.

 J&K
'विकासाच्या नावाखाली जनतेला गूळ दाखवण्याची पवारांची जुनी परंपरा'

दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, 7 वर्षांची मुलगी जखमी

याआधी जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashimir) श्रीनगरमधील सौरा भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली. तर या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याची 7 वर्षांची मुलगी जखमी झाली. श्रीनगर जिल्ह्यातील सुरा भागात हा हल्ला झाला. सैफुल्लाह कादरी असे या घटनेत मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

कुलगाममध्ये ग्रेनेड हल्ला

याशिवाय मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये CRPF आणि पोलिसांच्या नाका पार्टीवर हल्ला केला. यामध्ये तीन नागरिक जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यारीपोरा येथील नाका पार्टीवरही दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, लक्ष्य चुकल्याने ग्रेनेड रस्त्यावर पडल्यानंतर त्याचा स्फोट झाला. तेथून जाणारे तीन नागरिक जखमी झाले. हल्ल्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिले, त्यामुळे ते पळून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com