अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तीन जणांना अटक 

पीटीआय
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जम्मू : जम्मूमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक केली असून, त्यात एका आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांकडून जप्त करण्यात आलेल्या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही चार कोटी रुपये असल्याचे त्यांनी नमूद केले.

अली महंमद ऊर्फ इश्‍क, अल बकर या दहशतवादी संघटनेचा माजी सदस्य असलेला सोहील अहमद आणि प्रदीप कुमार अशी अटक केलेल्या तीन जणांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 
आंतरराज्य अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तीन जणांकडून 13 लाख रुपयांची रोकड आणि एक किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे, असे जम्मूचे पोलिस अधीक्षक विनय शर्मा यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या हेरॉइनची किंमत चार ते पाच कोटी रुपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Three people arrested for drug trafficking