मध्य प्रदेशात बलात्काराबद्दल तिघांना अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

जबलपूर: शहरातील गोरखपूर भागात 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाच जणांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ हा प्रकार सुरू होता, अशी माहिती पोलिस अधीक्षक अर्जुन उईके यांनी दिली.

दोन आरोपी फरारी असून, सर्वांची वये 18 ते 21 वर्षांदरम्यान आहेत. या मुलीचा गर्भपात करण्यात आल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर ही घटना उघडकीस आली. स्वयंपाक करण्याच्या निमित्ताने बोलावून घेऊन हे पाच जण मुलीवर अत्याचार करीत होते, असे उईके यांनी नमूद केले. गर्भपात करणाऱ्या डॉक्‍टराचा शोधही घेतला जात आहे.

Web Title: three people arrested in madhya pradesh for rape