पाककडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडून पाकिस्तानचे तीन सैनिक ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार केले.

श्रीनगर : पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार केले. याबाबतची माहिती पाकिस्तान सैन्याच्या मीडिया विंगने एक पत्रक काढून दिली. 

सीमारेषेवरील रावलकोट सेक्टर येथे ही चकमक झाली. भारतीय लष्कराने पाकिस्तान सैन्यावर कारवाई केली. भारताने प्रत्युत्तरादरम्यान केलेल्या गोळीबारात मोठे नुकसान झाले आहे. याबाबत भारतीय सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सैनिकांना ठार करण्यात आल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. तसेच भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानातील सात चौक्याही उद्ध्वस्त केल्या आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पूँच जिल्ह्यात सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून काल (सोमवार) गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये एक पोलिस निरीक्षक हुतात्मा झाले होते. पाच वर्षांच्या बालिकेसह दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

Web Title: Three Soldiers of Pakistan Died in Indian Firing