काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा; 1 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

पुलवामामधील दलीपोरा येथे आज पहाटेपासून चकमक सुरु होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, 1 जवान हुतात्मा झाला आहे. 

पुलवामामधील दलीपोरा येथे आज पहाटेपासून चकमक सुरु होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र, या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे.

शोपियाँमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three terrorists killed and one jawan has lost his life in Pulwama encounter