काश्मीरात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

बारामुल्ला : काश्मीरातील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांची आज (शुक्रवार) चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही चकमक बोनिआर परिसरात घडली.

बारामुल्ला जिल्ह्यातील बोनिआर परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज (शुक्रवार) सकाळी लष्काराने या परिसरातील सीमारेषेजवळ मोहीम सुरु केली. तसेच या परिसरात लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांकडून चार एके 47 ही जप्त करण्यात आले. या परिसरात लपलेल्या काही दहशतवाद्यांचा शोध अद्यापही सुरू आहे.  

दरम्यान, काश्मीरमध्ये सध्या 250 तळांवर एकूण 300 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे.

Web Title: Three Terrorists Killed In Jammu And Kashmir