म्हशींची वाहतूक करणाऱ्या तिघांना गोरक्षकांकडून मारहाण

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

एका ट्रकमधून म्हशींची वाहतूक करणाऱ्या तिघांना शनिवारी रात्री राजधानी दिल्लीतील कलकाजी मेट्रो स्थानकाजवळ गोरक्षकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - एका ट्रकमधून म्हशींची वाहतूक करणाऱ्या तिघांना शनिवारी रात्री राजधानी दिल्लीतील कलकाजी मेट्रो स्थानकाजवळ गोरक्षकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिस नियंत्रण कक्षात शनिवारी रात्री एका दूरध्वनीद्वारे या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळाली. अत्यंत क्रूर पद्धतीने जनावरांना ट्रकमध्ये ठेवण्यात आल्याचे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. एका ट्रकमध्ये 14 म्हशींना घेऊन तीन जण गाझीपूर मंडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी त्यांना रोखले आणि मारहाण केली. या घटनेत म्हशीची वाहतूक करणारे रिझवान (वय 25), अशू (वय 28) आणि कामील (वय 25) जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास सुरु असून त्यातील दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन पोलिस उपायुक्त रामील बनिया यांनी दिले. दरम्यान प्राण्यांची क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Web Title: Three thrashed by gau rakshaks, Delhi police assures action