तेरा राज्यांवर अतिवृष्टीचे संकट 

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

जम्मू काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. 

नवी दिल्ली, ता. 6 (वृत्तसंस्था) : उत्तर भारतामध्ये धुळीच्या वादळाने थैमान घातल्यानंतर आता तेरा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांना अतिवृष्टी आणि वादळाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, या इशाऱ्यानंतर गृहमंत्रालयाने संबंधित राज्यांमधील प्रशासकीय यंत्रणांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

जम्मू काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Thunderstorm, heavy rain likely in 13 state