वाघाने चक्क खाल्ले वाघिणीला...

वृत्तसंस्था
सोमवार, 21 जानेवारी 2019

भोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाने वयस्कर वाघिणीला मारल्यानंतर खाऊन टाकल्याची दुर्मिळ घटना घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. वन अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

वाघ व वाघीणीमध्ये भांडण झाले. वाघाणे वयस्कर असलेल्या वाघिणीला ठार मारले. विशेष म्हणजे या वाघिणीला वाघाने खाऊन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जंगलात वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

कान्हा नॅशनल पार्कचे फील्ड डायरेक्टर के कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, 'मुंडीदादरमध्ये शनिवारी पेट्रोलिंग करणाऱ्या एका पथकाला एका वाघिणीचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला आणि शरीरातील अर्धे अवयव गायब होते. वाघांमध्ये मांसावरून भांडणाचे किरकोळ प्रकार होत असतात. परंतु, वाघाणेच वाघिणीला खाल्ल्याचा हा दुर्मिळ प्रकार घडला आहे. मृत जनावर एक वाघीण असावी, तर तिला मारुन खाणारा वाघ आहे. हा वर्चस्वाच्या लढाईचा परिणाम असू शकतो.'

शिकार करणाऱ्या वाघाने आपली भूक भागवण्यासाठी वाघिणीची शिकार केलेली नाही. हे वर्चस्वाच्या लढाईमधून हा प्रकार घडला असावा, असही जाणकार सांगतात. मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यात असलेलं कान्हा पार्क वाघांसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. कान्हा नॅशनल पार्क हा व्याघ्र संरक्षित भाग असल्याने इथे वाघांची संख्या जास्त आहे.

Web Title: tiger eats tigress in kanha national park of madhya pradesh